इंदापूर ता.प्रतिनिधी - अनिल गुळूमकर
गंगावळण विठाबाई अभिनव सर्वसाधारण सहकारीसंस्थेची चेअरमन पदाची निवडणूक बुधवार दि.१९ जानेवारीरोजी पार पडली. चेअरमन पदाकरिता प्रशांत ज्ञानदेव गलांडेयांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारीश्री.पी.सी फडतरे यांनी अर्ज छाननी अंती प्रशांत गलांडे यांचीनूतन चेअरमन म्हणून घोषणा केली विठाबाई अभिनव सर्वसाधारण सहकारी संस्थेची स्थापनाझाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. प्रशांत गलांडे यांचीसंस्थेच्या चेअरमन पदी निवड होणेसाठी संचालक प्रशांत उध्दवकाळभोर यांनी त्यांच्या नावाची सुचना मांडली होती तरसंचालक सचिन सुरेश जगताप यांनी त्यास अनुमोदन दिलेत्यानंतर ही निवड बिनविरोध पार पडली.
