लोक सह्याद्री ई न्युज
मावळ प्रतिनिधी - रोहित चोपडे
मावळ दी. २१
भाजे गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादूर्भावामुळे गावोगाव यात्रा बंद असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द झाले होते. परंतु कोरोना कमी झाल्याने पुन्हा एकदा यात्रा उत्सवाला सुरवात झाली असून भाजे मावळ येथे श्री दत्त जयंती उत्सवाची सांगता लालमातीतल्या भव्य कुस्त्यांचा आखाडा घेत सांगता करण्यात आली.यावेळी भाजे ग्रामस्थ उत्सव कमिटी ग्रामपंचयातीच्या यांच्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सांगता कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने करण्यात आली. शनिवारी दत्तजयंतीला उत्सवाची सुरवात अभिषेक करुन दत्तगुरुंची भव्य पालखीची ढोलताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली.गावातील सर्व आबाल वृध्द मिरवणूकीत सहभागी झाले होते. उत्सवानिमित्त दोनदिवस कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
शनिवारी रात्री मनोरंजनासाठी 'अशी आमची माय मराठी' मराठी हिंदी गीतांचा ऑकेस्ट्रा कार्यक्रम घेण्यात आला तर रविवारी दुसऱ्या दिवशी भव्य कुस्ती स्पर्धा घेण्यात आली.५१ रु ते ७००० रु पर्यत बक्षीस देण्यात आले. यावेळी मावळ तालुक्यासह पुणे, कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, कोकण भागातील पैलवानानी हजेरी लाऊन आखाड्याची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे संयोजन समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचयात उत्सव कमिटी भाजे यांच्यावतिने करण्यात आले होते.