latest

दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात दौंड तालुक्यातील गोर गरीब रुग्णांना डायलिसीसची मोफत सुविधा उपलब्ध..

दौंड तालुका प्रतिनिधी - परशुराम निखळे              

दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अशा या डायलिसीस युनिटमध्ये रूग्णांच्या देखरेखीसाठी आवश्यक सर्व उपकरणांचा समावेश असून सिद्धिविनायक ट्रस्ट च्या माध्यमातून २ डायलिसीस मशीन व युवा उदयोजक श्री. जितेंद्र मगर यांनी स्व. निवृत्ती कोंडीबा मगर यांच्या स्मरणार्थ आवश्यक फर्निचर आणि वातानूकलन यंत्रणा दिली आहे.

उच्च रक्तदाब, मधुमेह आदी व्याधींमुळे किडनी (मूत्रपिंड) निकामी झाल्यानंतर रुग्णाला डायलिसीसची आवश्यकता असते परंतु डायलिसीस साठीच्या अपुर्‍या सुविधा व त्याचा खर्च गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर असतो तेव्हा दौंड तालुक्यातील गोर गरीब रुग्णांना डायलिसीसची मोफत सुविधा उपलब्ध होणार असुन उपचारासाठी त्यांना पुण्याला जायची गरज भासणार नाही.

प्रसंगी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व सर्व कर्मचारी बंधु भगिनींशी आमदार राहुल कुल यांनी संवाद साधला.

आमदार राहुल कुल यांनी सिद्धिविनायक ट्रस्टकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे उपलब्ध झालेल्या डायलिसीस मशीन कार्यान्वित करण्यात येत आहे. सुसज्ज अशा या डायलिसीस युनिटमध्ये फ्रेसिनियस मेडिकल केअर कंपनीचे २ जागतिक दर्जाचे डायलिसिस मशीन, आरओ वॉटर प्लांट , डायझर रीप्रोसेसर मल्टी-पॅरा मॉनिटर्स आदी तसेच रूग्णांच्या देखरेखीसाठी आवश्यक इतर उपकरणांचा समावेश असून त्याची एकूण किंमत २० लाख रुपये आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नगरसेविका अरुणाताई डहाळे, डॉ. दीपक जाधव, जितेंद्र मगर, राजू गजधने यांच्यासह वैद्यकीय रुग्णालयातील सर्व अधिकारी, सेवक उपस्थित होते.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.