इंदापूर ता. प्रतिनीधी
इंदापूर येथील बहुचर्चित दोनशे कोटीहून अधिक रुपयांच्या फसवणुकीच्या भिषी प्रकरणात अँड.राहुल मखरे यांनी आज दिनांक 23 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन भिषी संदर्भातील त्यांची भूमिका जाहीर केली. मागील काही दिवसापासून इंदापूर शहरातील सामान्य नागरिक, व्यापारी, मजूर यांचे भिषीमध्ये अडकलेले कोट्यावधी रुपये मिळावेत म्हणून सर्व लोकांनी एकत्र येऊन इंदापूर पोलिस स्टेशन व इंदापूर तहसीलदार यांना निवेदन दिले व इंदापूर पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात विनंती केली असता पोलिस प्रशासनाने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल केले आणि त्याप्रमाणे तत्पर कारवाईही केली पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी इंदापूर येथे पथके तयार करून या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याचे सत्र सुरू केले व गुन्ह्याचा तपास करून लवकरात लवकर या फसवणूक प्रकरणाचा छडा लावण्याचे काम हाती घेतल्याचे दिसून आले फसवणूक झालेले व्यापारी व सामान्य नागरिकांनी इंदापूर पोलिस स्टेशनचे मुजावर साहेब यांची भेट घेऊन अभिनंदन केले होते.या पार्श्वभूमीवरच आज अँड. राहुल मखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली ते म्हणाले की मागील काही दिवसांपासून मी या प्रकरणांमध्ये अडकलेल्या सामान्य नागरिक व्यापारी यांचे पैसे कशाप्रकारे परत मिळवता येथील आणि या मध्ये जे बीसी चालक पैसे देण्याच्या मनस्थितीत आहेत त्यांना सहकार्य करून सुवर्ण मध्य काढून सदर प्रकरणी पैसे परत घेण्याची प्रक्रिया करण्यासाठी सहकार्य केले पाहिजे व जे काही भीषी चालक आणि या प्रकरणाच्या मागे बेनामी संपत्ती जमा करून सामान्य नागरिकांना फसवण्याचा भूमिकेत असलेल्या सर्व लोकांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे. सामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे परत मिळावेत म्हणून बहुजन मुक्ती पार्टी पहिल्यापासूनच सकारात्मक आहे व फसवणूक झालेल्या सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहणार आहे. असे त्यांनी सांगितले.
मध्यम मार्ग स्वीकारला तर पैसे मिळण्याची प्रक्रिया सोपी होईल अन्यथा भिसी संदर्भात कोणत्याही प्रकारचा ठोस कायदा नसल्यामुळे पैसा परत मिळण्याची शास्वती देणे अवघड आहे याचे भान ठेवून सर्व भिशी सभासदांनी जे लोक भिषी चालक पैसे देण्यास सकारात्मक आहेत त्यांना सहकार्य करावे व त्यांना कायदेशीर प्रक्रियेत न अडकवता आपले पैसे आपणाला कसे परत मिळतील याप्रकारे मध्यम मार्ग काढावा केवळ स्टंटबाजी करून काही हाती लागणार नाही या वस्तुस्थितीचे भान ठेवावे असे अँड. राहुल मखरे यांनी सांगितले.
