
वडशिवणे प्रतिनिधी ,(महेश कामटे)
सोलापूर पुणे रेल्वे मार्गावर रेल्वे दूहेरीकरण काम वेगाने सुरू असुन भाळवणी ते वाशिंबे,पोफळज, जेऊर, भाळवणी असे 26.33 किलोमीटर दूहेरीकरण काम पूर्ण झाले असून रेल्वे सुरक्षा आयुक्त आरोरा मध्ये रेल्वे मुंबई यांनी मंगळवारी 26 रोजी वाशिंबे रेल्वे स्थानक ते भाळवणी रेल्वे स्थानक पर्यंत कामाची पाहणी केली व दुहेरी करण काम पूर्ण झाले असून बुधवारी 27 रोजी या मार्गावर रेल्वे चाचणी झाली आहे.

या वेळी आरोरा यांच्या उपस्थितीत वाशिंबे रेल्वे स्थानकाच्या नुतन ईमारती चेही उद्घाटन करण्यात आले आहे.यावेळी रेल प्रबंधक शैलेंद्र गुप्ता, वरीष्ठ मंडल परिचालन प्रबंधक एल,के रणयेवले संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या दरम्यान याच मार्गावरील वाशिंबे ते भिगवण मार्गावरील अंतिम टप्यातील 29 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू असुन मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
