latest

भा.ज.पा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या आंदोलनाचा धसका घेऊन सोनंदचा ३३ केव्हीचा विजपुरवठा २४ तासात सुरळीत..

सांगोला प्रतिनिधी -  सिध्देश्वर गाडे
सांगोल्यात महावितरणचा कारभार रामभरोसे सुरू आहे. कुणाचा कुणाला मेळ नाही. अशातच सोनंदचा 33 केव्ही ट्रान्सफॉर्मर जळाला आणि संपूर्ण गावाला फटका बसला. फळबाग, पालेभाज्या,पिके पाण्याअभावी होरपळून निघाली. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आंदोलनाचा इशारा दिला. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या आंदोलनाचा धसका घेऊन २१ दिवसाचा कालावधी सांगणा-या महावितरणने २४ तासात  सोनंदचा 33 केव्ही ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू केले आहे.भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आंदोलन व रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी सकाळी सकाळीच ट्रान्सफॉर्मर सोनंदमध्ये दाखल झाला. सांगोला तालुक्यात सोनंद येथील 33 केव्ही सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर 9 मार्च 2022 रोजी जळालेला आहे. त्यामुळे चार गावातील 225 लहान डीपी 17 दिवसापासून बंद आहेत.शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, पिकेही मोठ्या प्रमाणात जळाली आहेत. यांना कोण भरपाई देणार? त्यामुळे सर्वच गावकरी आक्रमक झाले होते.भाजपाच्या जिल्हाध्यक्षानी रस्ता रोकोसह आंदोलनाचा इशारा कालच दिला होता. अखेर यामुळे महावितरणने खडबडून जागे होत सूत्रे हलविली.गुरुवार 24 मार्च रोजी सकाळीच हा ट्रान्सफॉर्मर सोनंदमध्ये दाखल झाला, तो बसविण्याची प्रक्रियाही काल शुक्रवारी पूर्ण झाली. त्यामुळे या परिसरातील गावामधील शेतकरी व ग्रामस्थ आनंदित झाले आहेत.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.