latest

अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद

टेंभुर्णी प्रतिनिधी‌

टेंभुर्णी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगीरी टेंभुर्णी पोलिस ठाणे गु.र.नं. ६७/२०२२ भादंवि ४५७,३८०,३४ प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयामध्ये फिर्यादी लक्ष्मी तातोबा शिंदे, रा. कुर्डवाडी बायपास रोड, टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर यांची वयोवृध्द आई व अपंग भाउ राहत असलेले ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाचे जवळ, टेंभुर्णी येथे दि.३०/०१/२०२२ रोजी अज्ञात आरोपींनी त्यांचे राहते घराचे माळवदाचे छताचा पत्रा उचकाटून चोरी करुन फिर्यादी यांचे १५.५ (साडे पंधरा) तोळे वजनाचे सोने व फिर्यादीची आई यांचे ०३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १२ भार चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ७,२३,०७० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासकामी मा. पोलीस निरीक्षक सो. सरेश निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एम. पी.पवार व त्यांचे पथक रवाना होवून त्यांनी रेकॉर्ड वरील आरोपींना तपासत असताना गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने व सायबर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांचे मदतीने घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण/ ड्रमडेटा,सी.डी.आर व एस.डी.आर चे मदतीने रेकॉर्ड वरील आरोपी नामे
निलेश मगन खरात वय -३४ वर्षे, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर याने त्याचे साथीदार शंकर रोहिदास धोत्रे वय - २५ वर्षे, इंदिरानगर झोपडपट्टी, टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर, सुरज किशोर टेके रा.
नागनाथनगर, टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूर, सुर्यकांत बाळासाहेब ठोंबरे वय-३६ वर्षे, रा. सुर्डी ता. केज जि. बीड सध्या रा. विठ्ठल रखुमाई नगर , टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापूरयांनी मिळून सदर ठिकाणी घरफोडी केली आहे
असे प्राथमिक पुरावे मिळाल्याने वर नमुद आरोपींना ताब्यात घेवून सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करुन पोलीस कोठडी कालावधीत सदर आरोपींना अधिक विश्वासात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता दाखल गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या मालापैकी १०.५ तोळे सोने व ०९ भार चांदीचे दागिने सदर गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपीकडे अधिक तपास करीत असून त्याचे कडून आणखीन गुन्हे केल्याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी तेजस्वी सातपुते मॅडम,पोलीस अधिक्षक सो.सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव,अपर पोलीस अधिक्षक सो.सोलापूर ग्रामीण,विशाल हिरे,उपविभागीय पोलीस अधिकारी सो.करमाळा उपविभाग, करमाळा, सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, टेंभुर्णी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक श्रीमती मोनाली पवार, पोहेकॉ/२८० अभिमान गुटाळ, पोहेकॉ/९५ विलास नलवडे, पोना/१५७६ विनोद साठे, पोना/३३९ केशव झोळ, पोकॉ/२१४५ गणेश इंगोले, चापोकॉ/१३२३ खंडागळे व पोना/१६४१ सोहेल पठाण व सायबर पोलीस ठाणेचे पोना/२२२ व्यंकटेश मोरे यांनी केली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण सतर्क रहावे. संशयीत व्यक्तींची माहिती पोलीसांना कळवावी. अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देउ नये. कोणत्याही घटनेची माहीती तात्काळ पोलीसांना कळवावी,संपर्काकरीता ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करावा.
You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.