latest

अकलूज पोलीस स्टेशन व अकलूज नगरपरिषद यांचा अभिनव तेज उपक्रमामुळे चोरी दरोड्याच्या घटनेत मिळणार तत्काळ मदत, चोर दरोडेखोर होणार जागेवर जेरबंद

अकलूज प्रतिनिधी -

अकलुज पोलीस ठाणे हद्दीत ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
माननीय मिलींद षंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर, मा. तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या प्रयत्नातून व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज अकलुज पोलीस स्टेशन हद्दीतील 36 गावांसह अकलूज नगरपरिषदमधील मुध्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नागरीक यांचे 18002703600 प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री. डी. के. गोर्डे यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले.
गेल्या 9 वर्षांत पुणे, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे  व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटनां घडत असतांनाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट:

 1. घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
 2. गावातील कार्यक्रम ध् घटना विना विलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळणे.
 3. अफवांना आळा घालणे.
 4. प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
 5. पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये

 1. गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
 2. संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600
 3. यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
 4. संदेश देणार-या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
 5. दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकर्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
 6. नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
 7. नियमाबाह्य दिलेले संदेशध् अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
 8. एका गावात चोरी करून चोर दुसर्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
 9. वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
  10.घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.
  11. संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
  12.चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ठसंबा स्पेज होतात.
  13. गावाबाहेर दुसर-या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.

सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचा-यांना सूचना आदेश देता येणे शक्य असल्याचे ग्राम सुरक्षा यंत्रणेकडील सत्यशिल घाटगे याने सांगितले.
सदर कार्यक्रमाचे वेळी धैर्यशिल जाधव, मुध्याधिकारी नगरपरिशद अकलुज, डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग, अरुण सुगांवकर, पोलीस निरीक्षक अकलुज पोलीस ठाणे, अकलुज पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी, रमेश  सुरवसे पाटील  नागरगोजे, पोलीस मित्र, नगरपरिषद अकलुज मधील अधिकारी व कर्मचारी वर्ग, रोटरी क्लब अकलुजचे अध्यक्ष, सर्व सदस्य, मेडिकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, वैदयकिय अधिकारी, नागरीक, पत्रकार उपस्थित होते.  अकलुज नगर परिशद हद्दीतील नागरीकांचे मोबाईल नंबर सदर यंत्रणेमध्ये समाविश्ट करण्यासाठी भक्ती टायपिंग, अल्फाबाईट, भास्करे इन्फोटेक, सविता झेरॉक्स तसेच वैदयकिय अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांचे विशेष सहकार्य लाभले.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.