latest

अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

अक्कलकोट प्रतिनिधी - गौतम बाळशंकर

अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे रयत क्रांती संघटनेच्यावतीने मंगळवार दिनांक 29 मार्च रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शेतकरी मेळाव्यास अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अक्कलकोट तालुका अध्यक्ष नागेश नायकोडी यांनी केले आहे. या मेळाव्याला रयत क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सदाभाऊ खोत ,जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात,अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी ,जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक सुहास पाटील, जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे, डोंबरजवळगेचे सरपंच चिदानंद माळगे, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे ,सामाजिक कार्यकर्ते आसिफ यत्नाळ, नामदेव पवार ,शिवा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील ,करजगी सरपंच, उपसरपंच आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत .या कार्यक्रमाची माहिती तालुका अध्यक्ष नागेश नायकोडी व संयोजक मुनाफ चिरके यांनी दिली .

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.