टेंभुर्णी प्रतिनिधी:- नवनाथ नांगरे
टेंभुर्णी येथे आई-बाबा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे नुकताच पदभार स्वीकारुन पी.एस.आय पदावर रुजू झालेल्या मोनाली पवार मॅडम यांचा मानाची शाल,व श्रीफळ आणि पुष्पहार देऊन यथोचित असा गौरवपूर्वक सन्मान फाऊंडेशनच्या वतीने नुतन संचालिका सौ. विजया संतोष मोरे
यांच्या हस्ते करण्यात आला
टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दी मधील समस्त महिलांच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्था हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असून याबाबतीत मी स्वतः दक्ष राहून महिला आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी पवार मॅडम यांनी दिले . यापूर्वी तुळजापूर आणि आंबेजोगाई येथे महिलांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडली असल्याची काही साजिवंत उदाहरणे पवार मॅडम यांनी समोर मांडली
यावेळी आई-बाबा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ नांगरे ( सर ) फाऊंडेशनचे संचालक संतोष पोपट मोरे,सौ वैशाली नवनाथ नांगरे, अविनाश गोरख नांगरे आणि कु. सृष्टी ज्ञनवनाथ नांगरे आदी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
